सोलापूर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ जानेवारी २०२४ या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता जय भवानी प्रशालेचे मैदान येथे ‘हिंदुराष्ट्र जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सोलापूर शहरात प्रसार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीला शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख . बापू ढगे, माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी . यशपाल चितापुरे, . किरण जोशी, अविनाश जोशी यांसह मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते.
जुने विठ्ठल मंदिर येथून प्रसार फेरीची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर टिळक चौक – मधला मारुती – चौपाड बालाजी मंदिर – चौपाड विठ्ठल मंदिर – मोबाईल गल्ली – आंत्रोळीकर कोम्प्लेक्स मार्गे दत्त चौक येथील दत्त मंदिर येथे फेरीची सांगता करण्यात आली.फेरीच्या मार्गात अनेक हिंदुत्वनिष्ठानी धर्मध्वजाचे स्वागत केले. तसेच फेरी मार्गांवरील अनेकांनी हिंदुराष्ट्र हे आमच्या मनातील विषय असल्यामुळे सभेला येणार असल्याचे सांगितले. फेरीत महिला आणि लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता. फेरीत दिल्या जाणाऱ्या वीरश्रीयुक्त घोषणा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या.