39.6 C
Latur
Friday, May 2, 2025
Homeपरभणीपरभणी शहरात २८ डिसेंबर रोजी संस्कृत संमेलनाचे आयोजन

परभणी शहरात २८ डिसेंबर रोजी संस्कृत संमेलनाचे आयोजन

परभणी : संस्कृत भारती या संघटनेद्वारे अरबिंदो अक्षरज्योती विद्यालयाच्या सहकार्याने गुरुवार, दि. २८ डिसेंबर रोजी पाथरी रस्त्यावरील अरबिंदो अक्षरज्योती विद्यालयात संस्कृत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी २ ते सायंकाळी ५ दरम्यान हे संमेलन होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीमती शशी अय्यर तर उद्घाटक म्हणून डॉ. दिवाकर मांडाखळीकर, प्रमुख अतिथी म्हणून सौ. सुनिता जोशी तर प्रमुख वक्ते म्हणून संस्कृत भारती या संघटनेचे प्रांतमंत्री आचार्य अविनाश गोहाड हे उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनाचे सौ. मीनाताई मांडाखळीकर या संयोजिका असणार असून नरेंद्र नांदरकर हे जिल्हा संयोजक तर सौ. सरोजनी नरवाडकर या संमेलन संचालिका व राजेंद्र डोंगरे हे संमेलन कार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. या संमेलनात प्रत्येक शाळेचे किमान ५ विद्यार्थी, सर्व संस्कृत प्रेमी अभ्यासक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR