28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूर....अन्यथा सोलापूरला कर्नाटकात जावे लागेल

….अन्यथा सोलापूरला कर्नाटकात जावे लागेल

सोलापूर : गेले साठ वर्षे पळवापळवीला सरावलेल्या नेत्यांनी सोलापूरकरांचा आणखीन एक प्रकल्प बारामतीला पळवून नेला तरीही सोलापूरकर शांतच आहेत. काही विरोधी पक्षाचे राजकारणी याचे राजकारण करत आहेत. मात्र सोलापूर विकास मंच ही पळवापळवी सहन करणार नाही. आता ही पळवापळवी थांबवावी, अन्यथा सोलापूरला कर्नाटकात जावे लागेल, अशी भूमिका सोलापूर विकास मंच,वेकअप फाउंडेशन आणि गिरीकर्णिका फाउंडेशन यांनी घेतली आहे.

शेतकऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण केंद्र म्हणजेच श्री अन्न उत्कृष्टता केंद्र असे संबंधित आदेशावरून स्पष्ट दिसत असताना शाब्दिक वाद तयार करून दिशाभूल करण्याचे काम सध्या काही राजकीय पक्ष करत असून हेच केंद्र बारामतीला नेले जात आहे. ही घटना सोलापूरमधील शेतकरी व सोलापूरकरांवर अन्याय करणारी आहे. भरड धान्य उत्पादन करणारे शेतकरी, शेतकरी गट उत्पादक हे सोलापूर जिल्ह्यात जास्त असतील आणि त्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारे केंद्र बारामतीला का नेले जात आहे, हा एक विनोदी प्रकार असल्याचे सोलापूर विकास मंचचे म्हणणे आहे.

सोलापूर विकास मंचला एवढेच म्हणायचे आहे की, बास झाली हे आता पळवापळवी, सामान्य सोलापूरकरांना अजून किती काळ मूर्ख गृहीत धरून चालणार आहात? अशीच जर सोलापूरची पळवापळवी सुरू राहिली तर सोलापूरला कर्नाटकात जाण्यापासून गत्यंतर राहणार नाही. प्रशिक्षण केंद्र बारामतीला नेहण्याचा शासन निर्णय मागे घेतला नाही तर सोलापूर विकास मंच, वेकअप फाउंडेशन आणि गिरीकर्णिका फाउंडेशन सोलापूरच्या हितासाठी लवकरच मोठा निर्णय घेतील, असे या संघटनांनी स्पष्ट केले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR