नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानचे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक सलग दुस-या दिवशी पत्रकार परिषद घेतली असून ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल माहिती देताना लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई, व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद आणि एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हटले की आमची लढाई ही दहशतवाद्यांशी होती.
एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले, ‘काल आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या संयुक्त ऑपरेशनची सविस्तर माहिती दिली. आम्ही म्हटले होते की आमची लढाई दहशतवाद्यांशी आहे. आमची लढाई पाकिस्तानी लष्कराशी नाही. पाकिस्तानी सैन्याने हस्तक्षेप केला, आम्ही त्याला प्रत्युत्तर दिले. त्याआधी रविवारी संध्याकाळी ६:३० वाजता तिन्ही सैन्यांनी १ तास १० मिनिटे पत्रकार परिषद घेतली. १० मे रोजी संध्याकाळी ५ वाजता भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली.
एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले, ‘काल आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या संयुक्त ऑपरेशनची सविस्तर माहिती दिली. आम्ही म्हटले होते की आमची लढाई दहशतवाद्यांशी आहे. आमची लढाई पाकिस्तानी लष्कराशी नाही. पाकिस्तानी सैन्याने हस्तक्षेप केला, आम्ही त्याला प्रत्युत्तर दिले.
हल्ल्यात पाकिस्तानने चिनी शस्त्रांचा वापर केला
एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले, ‘पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात चिनी बनावटीची क्षेपणास्त्रे होती, यामध्ये लांब पल्ल्याच्या रॉकेट, यूएव्ही, काही हेलिकॉप्टर आणि चिनी बनावटीचे ड्रोन होते. आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना पाडले.
पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना पाठिंबा दिला
एअर मार्शल ए.के. भारती ‘आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी होती, ७ मे रोजी आम्ही फक्त दहशतवाद्यांवर हल्ला केला. पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना पाठिंबा दिला आणि आम्हाला प्रत्युत्तर द्यावे लागले. पाकिस्तानी सैन्य त्यांच्या झालेल्या नुकसानासाठी जबाबदार आहे.
फक्त दहशतवाद्यांच्या अड्डयांनाच टार्गेट केले : घई
लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, ‘पहलगाम हल्ल्यात २६ जण किती क्रूरतेने मारले गेले हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. यानंतर, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. यामध्ये शत्रूंचे मोठे नुकसान झाले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ७ मे रोजी केलेल्या कारवाईत आम्ही सीमेपलीकडे ९ ठिकाणी १०० दहशतवाद्यांना ठार मारले. यामध्ये कंधार अपहरण आणि पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेले ३ मोठे दहशतवादी चेहरे देखील होते.