37 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeराष्ट्रीय१.५ लाख मतांनी ओवेसींचा पराभव होणार

१.५ लाख मतांनी ओवेसींचा पराभव होणार

हैदराबाद : देशात लोकसभा निवडणूक २०२४ साठी जबरदस्त प्रचार सुरू आहे. सर्वच पक्ष आपापली भूमिका घेऊन जनतेपर्यंत पोहोचत आहेत. यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील भाजप उमेदवार माधवी लता यांचे कौतुक केले आहे. भाजपने माधवी लता यांना असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात मैदानात उतरवले आहे. ओवेसी यांचा दीड लाख मतांच्या फरकाने पराभव होईल, असे माधवी लतादीदी यांनी म्हटले आहे. तसेच ओवेसी आतापर्यंत बनावट मतांच्या आधारे निवडणुका जिंकत होते, असा दावाही माधवी लतादीदी यांनी केला आहे.

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात असलेल्या भाजप उमेदवार माधवी लता सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहेत. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत माधवी यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. यावेळी, ओवेसी दीड लाख मतांच्या फरकाने निवडणुकीत पराभूत होतील, अशी भविष्यवाणी त्यांनी केली. एवढेच नाही तर, आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये ओवेसी यांनी बनावट मतांच्या आधारे विजय मिळवला आहे, असा दावाही त्यांनी केला. तसेच, आमच्याकडे अशी खोटी व्होट बँक असती तर, आम्ही ४ हजार वर्षे जिंकत राहिलो असतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

बनावट मतांच्या बळावर जिंकताहेत ओवेसी
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर ईपीआयसी क्रमांक टाइप केल्यास, आपल्याला एकट्या चारमिनार भागात ६०,००० बनावट मते मिळतील, येथे एकाच मतदाराकडे दोन ठिकाणची मतदार ओळखपत्रे आहेत असा दावाही माधवी लतादीदी यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR