मुंबई : महादेव बेटिंग अॅपच्या मालकाला अटक झाली आहे. महादेव बेटिंग अॅपचा मालक रवी उप्पल याला दुबईतून अटक करण्यात आली आहे. रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ही अटकेची कारवाई झाली आहे. रवी उप्पलसोबतच इतर दोन जणांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सौरव चंद्राकर आणि रवी उप्पल या सगळ्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. ईडीकडून या दोघांचा शोध सुरू होता. या दोघांच्या विरोधात ईडीने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. याच नोटीसच्या आधारे दुबईच्या स्थानिक पोलिसांनी रवी उप्पलला अटक केली आहे.