28.7 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeराष्ट्रीयराजकोटमधील गेम झोनच्या आगीत मालक प्रकाश हिरणचा मृत्यू

राजकोटमधील गेम झोनच्या आगीत मालक प्रकाश हिरणचा मृत्यू

डीएनएचा नमुना आईशी जुळला

अहमदाबाद : राज्यातील राजकोट येथील टीआरपी गेम झोनला लागलेल्या भीषण आगीत गेम झोनचे मालक प्रकाश हिरण यांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए नमुना, अहमदाबादमध्ये राहणा-या प्रकाश यांच्या आई विमला देवी यांच्या डीएनए चाचणीच्या नमुन्याशी जुळला आहे. गेल्या ४-५ वर्षांपासून ते राजकोटमध्ये राहत होते.

५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने तयार करण्यात आलेल्या गेम झोनमध्ये त्यांनी ३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांच्याकडे गेम झोनची ६०% हिस्सेदारी होती. गेम झोनच्या सहा भागीदारांपैकी एक असलेला आरोपी धवल ठक्कर याला गुजरात पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली.

लोक इतके भाजले की, ओळखही पटेना
गेल्या शनिवारी टीआरपी गेम झोनमध्ये आगीत १२ मुलांसह एकूण ३० जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. काही लोक इतके भाजले की, त्यांची ओळखही पटू शकली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR