29.1 C
Latur
Monday, May 5, 2025
Homeअंतरराष्ट्रीयमध्यस्थीसाठी पाकची भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर विनवणी

मध्यस्थीसाठी पाकची भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर विनवणी

भारताचा हल्ला टळावा यासाठी पाकचे प्रयत्न अमेरिका-रशियाने हात झटकले

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारतीय हवाई दल, लष्कर आणि नौदलाच्या युद्धाभ्यासांमुळे पाकिस्तानी लष्कर आणि सरकारची झोप उडाली आहे. भारताच्या लष्करी तयारीला घाबरलेला पाकिस्तान विविध देशांकडे मदतीची याचना करत आहे. भारताने हल्ला करू नये, असे समजून सांगण्याचे आवाहन पाकिस्तान भारताच्या मित्रराष्ट्रांकडे करत आहे. तुर्की-इराण आणि अमेरिकेनंतर पाकिस्ताननेही रशियाकडेही मदत मागितली आहे. अमेरिकेने तर पाकिस्तानला आधीच झिडकारले आहे.

दरम्यान, रशियातील पाकिस्तानी राजदूत खालिद जमाली यांनी पुतिन सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे. जमाली म्हणाले की, रशिया हा भारताचा धोरणात्मक भागीदार आहे आणि पाकिस्तानचा मित्रही आहे. अशा परिस्थितीत, रशियाने तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करावी. १९६६ च्या ताश्कंद करारात रशियाने अशीच मदत केली होती. त्यानंतर तत्कालीन सोव्हिएत युनियनने लष्करी संघर्ष संपवण्यास मदत केली, अशी आठवण जमालीने रशियाला करुन दिली. पण, रशियाकडून पाकिस्तानला कुठलीही मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

इराणलाही केले आवाहन
भारताच्या जवळ असलेल्या इराणकडूनही पाकिस्तानला मदतीची अपेक्षा आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरकची इस्लामाबादला पोहोचले आहेत. तेथून ते नवी दिल्लीलाही भेट देणार आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानने त्यांच्याकडेही भारताला समजावून सांगण्याचे आवाहन केले आहे.

तुर्कीकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न
एकीकडे पाकिस्तान शांततेचे आवाहन करत आहे आणि दुसरीकडे जगभरातील शक्तिशाली देशांकडे मदत मागत आहे. दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांचा तुटवडा लक्षात घेता, पाकिस्तान तुर्कीसारख्या देशांकडूनही लष्करी मदत घेत आहे. तुर्कीही युद्धनौकाही कराचीत पोहोचली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR