नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर अतंर्गत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्डयांवर हल्ला करत त्यांना उद्ध्वस्त केले. यानंतर बलुचिस्तान आक्रमक झाला असून बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तान नाही असे म्हणत बलुच नागरिक रस्त्यावर उतरत त्यांनी पाकिस्तानचा झेंडा उतरवत स्वत:चा वेगळा झेंडा हाती घेतला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. बलुचिस्तान सैनिकांकडून पाकिस्तान आणि चीनला धमकी देण्यात आली आहे. बीआरआय प्रोजेक्टचे काम बंद करा अन्यथा हल्ला करू, अशी थेट धमकीच बलुचिस्तान सैनिकांकडून पाकिस्तान आणि चीनला दिली आहे. इतकेच नाहीतर ग्वादर पोर्टला चीन आणि पाकिस्तानला हात लावू देणार नसल्याचेही बलुचिस्तानने ही धमकी देताना म्हटले आहे. पाकिस्तानने बलुचिस्तानमधून सैनिक काढले नाही तर अजून हल्ला करू असा इशाराही बलुचिस्तान आर्मीकडून पाकिस्तानला देण्यात आला आहे.
भारत आणि पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे बलुचिस्तान देखील स्वातंत्र्यासाठी आक्रमक झाला आहे. बलुचिस्तान लिब्रेशन आर्मीने पाकिस्तानवर हल्ले करत त्यांना सळो की पळो असे केले आहे. अशातच बलुचिस्तान आर्मीने एक तृतीयांश भागावर ताबा घेतल्याचा दावा केला जात असल्याची माहिती मिळत आहे.