27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeअंतरराष्ट्रीयट्रम्प हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन?

ट्रम्प हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन?

शूटरला दिला ४ लाखांचा ऍडवान्स

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या महिन्यात निवडणूक रॅलीदरम्यान हल्ला झाला होता. या प्रकरणात आता पाकिस्तानी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली अमेरिकन गुप्तचर संस्था ‘एफबीआय’ने आसिफ मर्चंट नावाच्या तरुणाला अटक केली. तो पाकिस्तानचा रहिवासी आहे. आसिफच्या अटकेने या प्रकरणाच्या तपासाला पुन्हा वेग आला आहे.

एफबीआय म्हणजेच फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने आसिफ मर्चंट नावाच्या पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. तो या हल्ल्याच्या कटात सामील असल्याचे सांगितले जात आहे. ‘एफबीआय’च्या म्हणण्यानुसार, ४६ वर्षीय आसिफने माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची हत्या करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलरची नियुक्ती केली होती. त्याने त्याला पाच हजार अमेरिकन डॉलर्स (४.१९ लाख रुपये) अ‍ॅडवान्स दिले होते. एफबीआयने सांगितले की, आसिफ १२ जुलै रोजी अमेरिकेतून फरार होण्याचा प्रयत्न करत होता, पण वेळीच तो पकडला गेला.

असिफला इराणने अमेरिकेत पाठवल्याचा दावाही एफबीआयने केला आहे. तो अंडर कव्हर एजंटही असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेची जबाबदारी सिक्रेट सर्व्हिसकडे होती. पण आता एफबीआयने या हल्ल्यात इराण आणि पाकिस्तानचा अँगलही असल्याचे सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR