नवी दिल्ली : पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणा-या घरच्या टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. १७ सदस्यीय संघाची कमान बाबर आझमकडे सोपवण्यात आली आहे. शाहीन शाह आफ्रिदीला हटवून बाबर आझमला पाकिस्तानच्या टी-२० संघाचे कर्णधारपद मिळाले आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिका १८ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिका एकूण ५ सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेतील पहिले ३ सामने रावळपिंडीत खेळवले जाणार आहेत. तर शेवटचे २ सामने लाहोरमध्ये होणार आहेत. रावळपिंडी येथे होणारे पहिले ३ सामने १८, २० आणि २१ एप्रिल रोजी होणार आहेत.
तर लाहोरमध्ये २५ आणि २९ एप्रिल रोजी सामने होणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यापूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक यांचीही नावे जाहीर करण्यात आली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानने अझहर महमूदची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. अझहर महमूद २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणा-या पाकिस्तानी संघाचा गोलंदाजी प्रशिक्षकही होता.
न्यूझीलंडविरुद्ध टी -२० मालिकेसाठी पाक संघ
बाबर आझम (कर्णधार), शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद रिझवान, अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी. मोहम्मद आमिर, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, श्याम अयुब, शादाब खान, उसामा मीर, उस्मान खान, जमान खान