31.2 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यातील एनडीए परिसरात आढळली पाकिस्तानी नोट

पुण्यातील एनडीए परिसरात आढळली पाकिस्तानी नोट

सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रकार असल्याने खळबळ

पिंपरी : मुळशी तालुक्यातील भुकूम येथे पाकिस्तानी चलनातील नोट आढळली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. स्काय आय मानस लेकसिटीमधील आयरिस-३ हाउसिंग सोसायटीत शनिवारी (दि. ८) सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान हा प्रकार समोर आला. ही सोसायटी नॅशनल डिफेन्स अ‍ॅकडमीच्या (एनडीए) हद्दीपासून काही मीटर अंतरावर आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर मानला जात आहे.

हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष सहदेव यादव यांनी याबाबत बावधन पोलिस ठाण्यात अर्ज दिला आहे. यादव हे त्यांच्या सोसायटीतील इतर दोघांसोबत शनिवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान लिफ्टमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांना लिफ्टजवळ एक चलनी नोट दिसून आली. त्या नोटवर स्टेट बँक ऑफ पाकिस्तान असे नमूद असल्याचे दिसून आले. त्यामुळे यादव यांनी पोलिसांकडे धाव घेत अर्ज दिला. तसेच पाकिस्तानी चलनी नोट देखील पोलिसांच्या ताब्यात दिली.

बावधन पोलिसांनी संबंधित सोसायटीत पाहणी केली. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमे-यांचे रेकॉर्डिंग होत नसल्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांकडे चौकशी करण्यात येत आहे. तसेच सोसायटीत कोण आले? डिलिव्हरी बॉय आले का? याबाबतही पोलिस माहिती घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR