सोलापुर : प्रतिनिधी
पंडित दीनदयाल उपाध्याय दंत महाविद्यालय, रुग्णालय, सोलापूर-केगाव, येथे रुग्णालय परिसरात जैव वैद्यकीय कचर्याचे गैरव्यवस्थापन आणि विघटन पर्यायाने पर्यावरणास धोका निर्माण झाल्याबावत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशीक अधिकारी नीखील मोरे यांना बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सोनवणे यांनी निवेदन दीले होते.याबरोबरच त्यांनी अस्ताव्यस्त पडलेल्या जैववैद्यकीय कचर्याची छायाचीत्रेही प्रदुषण मंडळाला पुराव्यादाखल दीली होती मात्र थातुरमातूर उत्तरे देऊन त्यांची बोळवण करण्यात आली.
सोलापूर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयातील जैववैद्यकीय कचर्याचे गैरव्यवस्थापन आणि अयोग्य विल्हेवाट याबाबत महाविद्यालय गंभीर नाही. दंत महाविद्यालयाच्या आवारातच जैव वैद्यकीय कचऱ्याची अपुरी हाताळणी आणि विल्हेवाट लावली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे केवळ विद्यार्थी, कर्मचारी आणि अभ्यागत यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेलाच नाही तर मोठ्या प्रमाणावर पर्यावरणालाही धोका निर्माण होतो आहे.
विशेषतः कॉलेज कॅम्पसमध्ये जैववैद्यकीय कचरा सर्वत्र पसरलेला आहे ज्यामध्ये सिरिंज, रक्ताने भरलेले कापसाचे तुकडे, संक्रमित हातमोजे आहेत. हे केवळ पर्यावरणीय नियमांचे उल्लंघनच नाही तर त्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक मानके राखण्यात गंभीर दुर्लक्ष झाले आहे.
योग्य कचरा व्यवस्थापन प्रोटोकॉल अंमलात आणणे, कचरा विल्हेवाट लावण्यात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियमित प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे आणि योग्य विल्हेवाटीच्या सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे. कॉलेजने दिलेल्या बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट टैंडर्सची पडताळणी करण्याची तातडीची आवश्यकता आहे. असे सोनावणे यांनी निवेदनात म्हटले होते.
यावर प्रदुषण नियंत्रण मंडळाने गोलमाल उत्तर दीले असून प्रदुषण नियंत्रण कार्यालयास प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने म.प्र.नि. मंडळ, सोलापूर कार्यालयाकडून सदर दंत महाविद्यालयाची पाहणी करण्यात आली असून, पाहणी दरम्यान आढळून आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने पंडित दीनदयाल उपध्याय दंत महाविद्यालय, रुग्णालय, सोलापूर- केगांव यांना समजपत्र देण्यात आले आहे. तसेच याबाबतचा सविस्तर खुलासा सादर करणेबाबत दंत महाविद्यालयास कळविण्यात आलेले आहे व त्या अनुषंगाने पुढील कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.असे सोनावणे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.यावरून प्रदुषण मंडळ फक्त कागदी घोडे नाचवून संबंधीत महाविद्यालयावर कारवाईस टाळाटाळ करत असल्याचे प्रवीण सोनावणे म्हणाले.