21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्यापॅँडोरा पेपर्स : तेंडुलकर, अंबानीसह ३८० धनाढ्य भारतीयांची छुपी मालमत्ता उघड!

पॅँडोरा पेपर्स : तेंडुलकर, अंबानीसह ३८० धनाढ्य भारतीयांची छुपी मालमत्ता उघड!

पनामा पाठोपाठ आणि पॅँडोरा पेपर्सने जगभर उडवली खळबळ; कार्यवाही सुरू

नवी दिल्ली : पनामा पेपर्स नंतर आता पँडोरा पेपर्स समोर आले आहेत. यामधून समोर आलेल्या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे. पँडोरा पेपर्समधून जगभरातल्या अनेक राजकारणी आणि धनाढ्य लोकांच्या छुप्या मालमत्तेची माहिती मिळाली असून यामध्ये भारतातील अनेक दिग्गजांची नावे देखील समोर आली आहेत.

पँडोरा पेपर्समध्ये जवळपास ३८० भारतीयांची नावे आहेत ज्यांच्याविरोधात कारवाई देखील सुरू झाली आहे. पँडोरा पेपर्समध्ये उद्योगपतींपासून ते देश सोडून पळालेल्या उद्योगपतींचा देखील समावेश आहे. पँडोरा पेपर्समध्ये उद्योगपती अनिल अंबानी, नीरव मोदी, क्रिकेटर सचिन तेंडूलकर, जॅकी श्रॉफ, नीरी राडिया, हरीश साळवे यांच्यासह अनेक बड्या दिग्गजांची नावे आहेत.

दरम्यान ज्यांची नावे या यादीत आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी समन्स, संपत्ती जप्त करणे, आयकर आणि आरबीआयकडून माहिती मिळवण्यासाठी यंत्रणांकडून काम देखील सुरू झाले आहे.

या प्रकरणाच्या चौकशीत गौतम सिंघानिया, ललित गोयल, मालविंदर सिंह यांचा देखील समावेश आहे. पँडोरा पेपर्समध्ये १४ ऑफशोर सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या १ कोटी १९ लाख गुप्त दस्तावेजांचा उल्लेख आहे. यामध्ये अमाप पैसा असलेल्या लोकांकडून ग्लोबल मनी फ्लो मॅनेज करण्यासाठी वापरण्यात येणा-या २९,००० ऑफशोअर संस्थांच्या मालकीबद्दल माहिती देण्यात आली.

हा डेटा इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नलिस्ट्सकडून मिळाला असून १५० मीडिया पार्टनर्ससोबत तो शेअर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने या चौकशीचे नेतृत्व करण्यासाठी एक मल्टी एजेंसी ग्रुप (एमएजी) च्या स्थापनेची घोषणा देखील केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR