मुंबई : भाजप नेत्या पंकज मुंडे याना राजकारणातून डावलले गेल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. आता पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रीय राजकारणात जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता पंकजा मुंडे दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे. याबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजाताई आमच्या मोठ्या नेत्या आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले तर आनंदच होईल. पण त्याच्या बाबत आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
काही दिवसांआधी पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याबाबत भाष्य केले होते. प्रितम मुंडे यांना खाली बसवून मी राजकारणात पुढे जाणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र पंकजा मुंडे भाजपच्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात जाणार असल्याची चर्चा अद्याप थांबलेली नाही. प्रवीण दरेंकरांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेसाठी आता आमच मिशन ४५ नाही तर मिशन ४८ आहे. आम्ही पॅड बांधून तयार आहे. बॉल आला की बॅटिंग करणार आहोत. केव्हाही निवडणुकीस लागली तरी आम्ही सज्ज आहोत, असे ते म्हणाले.