परभणी : प्रतिनिधी
परभणी व बीड येथील घटनांसंदर्भात राज्य सरकारबरोबर चर्चा करून वस्तुस्थितीची माहिती देऊ परंतु बीड व परभणी येथील घडलेल्या घटना या संपूर्ण महाराष्ट्राला अस्वस्थ करणा-या असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. शरदचंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांच्या यांच्या कुटूंबियांशी सांत्वनपर भेट घेतल्यानंतर खा. फौजिया खान यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, परभणी व बीड येथील घटना दुर्देवी आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी हे चांगले नाही. दोन्ही घटनांमुळे महाराष्ट्र हादरला असुन दोन्ही घटनांबद्दल गांभीर्याने विचारमंथन व कारवाई होणे गरजेचे आहे.
आपण या संदर्भात राज्य सरकारबरोबर चर्चा करू, तसेच वस्तूस्थिती निदर्शनास आणू, असे ते म्हणाले. यावेळी खा. निलेश लंके, खा. फौजिया खान, खा. बजरंग सोनवणे, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष ऍड. विजय गव्हाणे, तहेसीन अहेमद खान, माजी आ. सुरेश वरपुडकर, माजी आ. सुरेश देशमुख, माजी आ.विजय भांबळे, माजी आ. बाबाजानी दुरार्णी, भगवानराव वाघमारे, नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख, किरण सोनटक्के, डॉ. अनिल कांबळे, रमाकांत कुलकर्णी, बाबुराव घाटुळ आदी उपस्थित होते.