36.8 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeमनोरंजन‘दीपवीर’ होणार आई-बाबा

‘दीपवीर’ होणार आई-बाबा

मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रेग्नंट असल्याच्या चर्चा मागील अनेक महिन्यांपासून सुरू होत्या. रणवीर सिंह आणि दीपिका यांनी आई-वडील होण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. दीपिका प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दीपिका आणि रणवीर आई-वडील होणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे.

दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाला काही महिन्यांआधीच ५ वर्षे पूर्ण झाली. लग्नाच्या पाच वर्षांनी दोघांनी आई-वडील होण्याचा निर्णय घेतला. दीपिकाच्या प्रेग्नंसीची माहिती मिळताच चाहत्यांनी दोघांवर आशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दीपिका काही दिवसांआधीच बाफ्टा अ‍ॅवॉर्डला भारताची प्रेझेंटेटर म्हणून उपस्थित राहिली होती. बाफ्टाला जाताना दीपिकाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. तेव्हा ती तिचा बेबी बंप लपवताना दिसली असे म्हटले जात होते. दीपिका आणि रणवीर लवकरच प्रेग्नन्सीची घोषणा करतील असेही म्हटले गेले होते. त्यानुसार पुढच्या १० दिवसांतच दीपिकाने तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे.

दीपिका आणि रणवीर यांनी १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्न केले. इटलीमध्ये दोघांनी शाही विवाह केला. दोघांच्या इटलीमधील डेस्टिनेशन वेडिंगची खूप चर्चा झाली होती. लग्नाच्या पाच वर्षांनी दीपवीर यांनी ‘कॉफी विथ करण’मध्ये त्यांच्या लग्नाचे खास क्षण सर्वांबरोबर पहिल्यांदा शेअर केले. दीपवीरच्या साखरपुड्यापासून, मेहंदी, लग्न विधींपर्यंत सगळे क्षण चाहत्यांना पाहायला मिळाले.

रणवीरने २०१५ मध्ये मालदीवमध्ये दीपिकाला प्रपोज केले होते. तिथेच त्यांनी सिक्रेट साखरपुडा केला. त्यानंतर दोघांनी त्यांच्या सिक्रेट साखरपुड्याबद्दल सर्वांना सांगितले. तेव्हा सगळे नाराज झाले होते. पण रणवीरने त्याच्या स्वभावाने सगळ्यांशी खास नाते निर्माण केले.
दीपवीर ही जोडी बॉलिवूडचे आयडिअल कपल म्हणून ओळखले जाते. याच आयडिअल कपलच्या आयुष्यात सप्टेंबर महिन्यात बाळाचे आगमन होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR