सोलापूर: जिल्हा परिषदेच्या २९शाळांत ८७ अंशकालीन निदेशकांची भरती करण्यात येणार आहे. त्याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिला आहे. त्यानुसार पदभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सहावी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना कलाशिक्षण, आरोग्य, कार्यानुभव व क्रीडा या विषयाचे ज्ञान व्हावे, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्यांच्यातील सुन कलागुणांना वाव मिळावा, यासाठी अंशकालीन निदेशक अथवा अतिथी निदेशक नेमण्याचा निर्णय झाला होता. परंतु काही कारणांमुळे त्यांची सेवा खंडित करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील ३४ जांसह राज्यभरातील ४ हजार ७६७जणांनी उच्य न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार १०० पटसंख्येच्या शाळेत अंशकालीन निदेशक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
तसा आदेश प्राप्त झाल्याने प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी संबंधित गटशिक्षणाधिका-यांना अंशकालीन निदेशक नेमणुकीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दरमहा सात हजार रुपयांच्या मानधनावर त्यांना नेमले जाणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १४ ऑक्टोबरला अंशकालीन अथवा अतिथी निदेशकांना नेमणुका देण्याचे आदेश काढले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ती रखडली होती.
आता आचारसंहिता शिथिल झाल्याने नेमणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून आदेश निघाल्याच्या ४५ दिवसांत अंशकालीन निदेशक पूर्वीसून ज्या शाळेत कार्यरत होते त्या शाळेच्या व्यवस्थापन समितीकडे अर्ज करावयाचा आहे. त्यानंतर व्यवस्थापन समिती त्याची पडताळणी व पटसंख्या पाहून नियुक्ती देणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागाने अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना आदेश दिले आहेत. अंशकालीन निदेशकांनी ४५ दिवसांत पूर्वी कार्यरत असलेल्या शाळेकडे अर्ज करावयाचा आहे. संबंधित शाळा व्यवस्थापन समिती त्याची पडताळणी करून व पटसंख्या पाहून नियुक्ती देईल. असे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगीतले.