मुंबई : राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा शासन निर्णय मंगळवारी कृषी व पदुम विभागाकडून जारी करण्यात आला. त्यानुसार राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे.
दरम्यान, मी या पदाचा वापर शेतक-यांच्या हितासाठी करणार आहे. दिल्लीत शेतीविषयक मते मांडण्यासाठी योग्य पद हाती असायला हवे, अशी शेतीतज्ज्ञांची भूमिका होती. त्यामुळे दिल्लीत शेतक-यांच्या समस्यांसाठी भांडू शकतो. महायुतीने माझ्यावर विश्वास टाकल्याने मी आभारी आहे, असे पाशा पटेल म्हणाले. २०१७ मध्ये त्यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.