21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीय६४ व्या वर्षी उत्तीर्ण केली नीट

६४ व्या वर्षी उत्तीर्ण केली नीट

बँकेतून निवृत्त झाल्यावर सुरू केले नवीन करिअर

बरगढ : शिक्षण घेण्यासाठी वयाची अट नसते हे एका व्यक्तीने सिद्ध केले आहे. माणूस वयाच्या कोणत्याही वर्षी यशस्वी होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. ६४ वर्षांच्या जय किशोर प्रधान यांनी नीट क्रॅक करून एक आदर्श निर्माण केला आहे. ते बँकेतून निवृत्त झाले आहेत.

जय किशोर प्रधान हे ओडिशातील बरगढ जिल्ह्यातील अट्टाबिरा येथील रहिवासी आहेत. ते आधी बँकेत कर्मचारी होते. बँकेतून निवृत्ती घेतल्यानंतर, त्यांना दुसरं करिअर सुरू करायचं होते. त्यांनी यासाठी मेडिकल फिल्ड निवडली. त्यांनी आय.एससी (इंटरमीडिएट इन सायन्स) पूर्ण केल्यानंतर नीटची परीक्षा दिली. पण तेव्हा ते नीट क्रॅक करण्यात यशस्वी झाले नाहीत.

प्रधान यांनी फिजिक्समधून बीएससी पूर्ण केली. अट्टाबिता एमई शाळेत शिक्षक म्हणून काम करू लागले. १९८३ मध्ये इंडियन बँकेत रुजू झाले आणि नंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रुजू झाले. पण याच दरम्यान त्यांनी नीट क्रॅक करण्याची तयारीही सुरू ठेवली. मेडिकल फिल्डमध्ये करिअर करण्याचे त्यांचे स्वप्न होते आणि शेवटी त्यांनी नीट क्रॅक केली.

जय किशोर प्रधान यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९५६ रोजी झाला. त्यांना दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा आहे. २०१६ मध्ये बँकेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी नीटची तयारी सुरू केली. डॉक्टर होऊन देशाची आणि समाजाची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांना लोकांची मोफत सेवा करायची होती. विशेषत: ते लोक जे अपंग आहेत. २०१८ पर्यंत, नीटमध्ये सहभागी होण्यासाठी कमाल वयोमर्यादा २५ वर्षे होती, जी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे. त्यामुळे प्रधान हे नीटच्या परीक्षेला बसू शकले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR