धाराशिव : प्रतिनिधी
एसटी बसमध्ये सुकटा येथील एक प्रवाशी का घेतला नाही, या कारणावरून एका प्रवाशाने बसचालकाला मारहाण केली. ही घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता भूम बसस्थानकात घडली. या प्रकरणी बस चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूम आगाराचे बसचालक विजय पांडुरंग बनसोडे हे चिंचोली ते भूम ही बस घेऊन जात होते. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी मिनीनाथ नरके रा. सुकटा याने चिंचोली बसस्थानक व भूम बसस्थानक येथे बसचालक विजय पांडुरंग बनसोडे यांना मारहाण केली. तु सुकटा येथील एक पॅसेंजर एसटी बसमध्ये का घेतला नाही, असे म्हणून शिवीगाळ करुन काठीने, लाथाबुक्यांनी मारहाण केली. जिवे ठार मारण्याची धमकी देवून शासकिय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी बसचालक विजय बनसोडे यांनी दि.२८ नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भूम पोलीस ठाणे येथे कलम ३५३, ३४१, ३२३, ५०४, ५०६ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.