25.3 C
Latur
Monday, November 4, 2024
Homeपरभणीपाथरीत राष्ट्रवादी अजीत पवार गटाचा उमेदवार बदलला

पाथरीत राष्ट्रवादी अजीत पवार गटाचा उमेदवार बदलला

परभणी / प्रतिनिधी
निवडणुकीचे वातावरण तापत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास काही तासांचा कालावधी उरला असतानाच पाथरीत महायुतीतील राष्ट्रवादी अजीत पवार गटाच्या उमेदवार म्हणून निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांना उमेदवारी जाहीर झाली असतांनाच आता ऐनवळी त्यांचेच सुपूत्र आ. राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली असून या संदर्भात राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

परभणी जिल्ह्यातील चारही मतदार संघात सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. पाथरीत महायुतीच्या उमेदवार श्रीमती निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकनकर या उपस्थित होत्या. यावेळी माध्यमांशी बोलतांना युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सांगितले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पाथरीत आ. राजेश विटेकर यांच्या नावावर शिक्कामार्तब केला असून आता तेच महायुतीचे उमेदवार असणार असल्याचे सांगितले.

कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन पक्षाने हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात बोलताना आ. राजेश विटेकर म्हणाले की, आपण दोनच दिवसापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केल असून पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास दाखविलेला असून आपण पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याशी चर्चा करून उद्या एबी फार्म दाखल करू असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR