14.3 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeधाराशिवपायल कदम हिचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते सत्कार

पायल कदम हिचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते सत्कार

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील कौडगाव (बावी) येथील माजी सैनिक दयानंद कदम यांची कन्या पायल कदम हिचा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते बारावी कॉमर्स परिक्षेत मोठे यश मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने १० हजार रूपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ शुक्रवारी दि. ८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने माजी सैनिक पाल्य पायल दयानंद कदम हिचा सन्मान करण्यात आला. बारावी कॉमर्स परिक्षेत ९३ टक्के गुण घेऊन यश मिळविल्याने जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांच्या हस्ते १० हजार रूपयांचा धनादेश, शाल, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, साहेबराव वाघमारे, माजीद काझी, शैलेश देव, सुधाकर परशे, प्रकाश अडगळे, उमेश राठोड, कोमल उंबरे, दयानंद कदम, छाया देडे आदीसह माजी सैनिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR