22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रलोकांनी मला भरभरून मतदान केले; पहिला नंबर माझाच

लोकांनी मला भरभरून मतदान केले; पहिला नंबर माझाच

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मी एक लाख मतांनी निवडून येणार, रोजगार हमी योजना मंत्री म्हणून मी राज्यात भरपूर काम केले असून लोकांनी मला भरभरून मतदान केले आहे. त्यामुळे खैरे-इम्तियाज जलील यांनी दुस-या क्रमांकासाठी स्पर्धा करावी, असा टोला लगावत संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी विजयाचा दावा केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची मतमोजणी जसजशी जवळ येत आहे, तशी उमेदवारांची उत्सुकता वाढली आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुती, महाविकास आघाडी आणि एमआयएमच्या उमेदवारांच्या तिरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी विजयाचा दावा करत स्पर्धा फक्त दुस-या नंबरसाठी असल्याचे सांगत इम्तियाज जलील व चंद्रकांत खैरेंना चिमटा काढला आहे.

भुमरे यांनी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे निष्क्रिय असल्याची टीका केली. तर यावेळी बोलताना ते म्हणाले, निकालाची धाकधूक आपल्या मनात अजिबात नाही. माझा विजय निश्चित होणार आहे, १ लाखाच्या मताधिक्याने माझा विजय होईल. पालकमंत्री, रोजगार हमी योजना मंत्री म्हणून महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात मी केलेले काम लोकांनी पाहिले आहे.

इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे यांनी एकमेकांशी स्पर्धा करावी. पण ती केवळ नंबर दोन आणि तीनला कोण राहणार यासाठी, असे म्हणत नंबर एकला आपणच राहणार असल्याचा विश्वास भुमरे यांनी व्यक्त केला असला तरी या मतदारसंघातून नेमका कोणाचा विजय होणार हे चार जूनला स्पष्ट होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR