29.8 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeमहाराष्ट्रओबीसी सभेकडे लोकांनी पाठ फिरवली

ओबीसी सभेकडे लोकांनी पाठ फिरवली

गर्दीच नसल्याने ९० टक्के खुर्च्या रिकाम्या

वर्धा : वर्धा जिल्ह्यात आज ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या मेळाव्यात अपेक्षित गर्दी जमली नसल्याने ९० टक्के खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आयोजकांकडून २५ हजार ओबीसी समाजबांधव या सभेला उपस्थित राहतील असा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात सभेच्या ठिकाणी ३०० ते ४०० लोकांची गर्दी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ओबीसी मेळाव्याकडे ओबीसींनी पाठ फिरवल्याची चर्चा सभास्थळी पाहायला मिळत आहे.

वर्धा जिल्ह्यात आज ओबीसी मेळावा होत असून, या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ उपस्थित आहेत. अकरा वाजता सुरू होणारी ही सभा दुपारी एक वाजता सुरू झाली. मात्र, तरीही सभेच्या ठिकाणी गर्दीच नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, छगन भुजबळ वर्धा शहरात दाखल झाले असून, मुख्य नेत्यांची भाषणे देखील सभास्थळी सुरू आहेत. मात्र, सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या खुर्च्यांवर, मोजक्याच लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR