25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणासाठी याचिका

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणासाठी याचिका

ज्ञानवापीचे तळघर उघडा प्रतिबंधित भागाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करा

नवी दिल्ली : काशी विश्­वनाथ मंदिराला लागून असलेल्या ज्ञानवापी परिसरात भारतीय पुरातत्­व सर्वेक्षण (एएसआय) विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, ज्ञानवापीच्या सध्याच्या रचेनेपूर्वी येथे भव्य हिंदू मंदिर होते, असे संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे. यातच आता ज्ञानवापीतील तळघर खुले करावे आणि प्रतिबंधित भागाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करावे, अशी विनंती करणारी याचिका हिंदू पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

काशीच्या ज्ञानवापीत असलेल्या कथित शिवलिंगाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश भारतीय पुरातत्व खात्याला द्यावेत, अशी मागणी करणारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंदू पक्षांनी दोन याचिका दाखल केल्या आहेत. एका याचिकेत वजुखान्याचे सील उघडून शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण करण्याची मागणी असून दुस-या याचिकेत दहा तळघरांचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिवलिंग असल्याचा हिंदूू पक्षाचा दावा
कथित शिवलिंगाला इजा न करता हे सर्वेक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात यावे, असा अर्ज हिंदू पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. वादग्रस्त जागेतील वजूखाना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संरक्षित करण्यात आला आहे. तो भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. तिथे आदि विश्वेश्वराचे शिवलिंग असल्याचा दावा हिंदू पक्षाकडून केला जात आहे. मात्र, ते कारंजे असल्याचा दावा मुस्लिम पक्षाकडून केला जात आहे.

आधुनिक बांधकाम जाणीवपूर्वक केले
या भागाचे मुस्लीम समाजासाठी कोणतेही धार्मिक महत्त्व नाही. कारण त्यांच्या मते तेथे एक कथित कारंजे आहे. पीठ, पीठिका इत्यादी शिवलिंगाशी निगडित मूळ वैशिष्ट्ये लपवण्यासाठी हे आधुनिक बांधकाम जाणीवपूर्वक केले गेले आहे. शिवलिंगाचा परिसर कृत्रिम भिंती उभारून लपविण्यात आल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. तसेच ज्ञानवापी येथील प्रतिबंधित केलेले क्षेत्र खुले करावे. प्रतिबंधित जागेत सर्वेक्षण करण्यास बंदी घालणारा आदेश मागे घ्यावा. वादग्रस्त जागेवर कृत्रिम भिंतींनी प्रतिबंधित केलेली वाराणसी मशिदीची १० तळघरे खुली करावीत. त्या ठिकाणी अरक मार्फत वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची परवानगी द्यावी, अशा मागण्या हिंदू पक्षाने आपल्या याचिकेत केल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR