बँकॉक : थायलंडचे पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांना न्यायालयाच्या आदेशाने हटवले आहे. त्यानंतर थायलंडच्या संसदेने त्यांच्या कन्या पेटोंगटार्न शिनावात्रा यांची शुक्रवार दि. १६ ऑगस्ट सर्वांत तरुण पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. ३७ वर्षीय शिनावात्रा यांना दोन तृतीयांश म्हणजे ३१९ मते मिळाली. तिची मावशी यिंगलक शिनावात्रा यांच्यानंतर पंतप्रधानपद भूषवणा-या त्या दुस-या महिला ठरल्या आहेत.
घटनेचे उल्लंघन केल्याप्रकरणी थायलंडच्या न्यायालयाने पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना पदावरुन बडतर्फ केले आहे. कधीकाळी तुरुंगवास भोगलेल्या एका माजी वकिलाची मंत्रिमंडळात नियुक्ती केल्याबद्दल थायलंडच्या न्यायालयाने थेट पंतप्रधानांवर पदावरून बडतर्फ केले आहे. श्रेथा यांचे वर्तन घटनेचे उल्लंघन करणारे असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे.
तुरुंगवास भोगलेल्या एकाची मंत्रीपदी नियुक्ती करून राजकीय उलथापालथ घडवून आणणे. तसेच सत्ताधारी युतीमध्ये बदल घडवून आणून नैतिकतेचे उल्लंघन केल्याचा ठपका न्यायालयाने पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांच्यावर ठेवला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळख असलेले श्रेथा हे याच न्यायालयाच्या निर्णयानंतर पदावरुन हटवण्यात आलेले १६ वर्षातील चौथे थायलंडचे पंतप्रधान आहेत. ते त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांना बडतर्फ करण्याच्या बाजूने न्यायालयाने ५-४ असा निकाल दिला आहे.