24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रपीएच.डी. बाबतच्या विधानावर अजित पवारांकडून दिलगिरी

पीएच.डी. बाबतच्या विधानावर अजित पवारांकडून दिलगिरी

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएच.डी. करणा-या विद्यार्थ्यांबाबत एक विधान केले. हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात बोलताना अजित पवार यांनी पीएच.डी.बाबत विधान केले. पीएच.डी. करून काय दिवे लावणार? असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत सुरू असलेल्या आंदोलनावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पीएच.डी. संदर्भात मी काल जी भूमिका मांडली त्याचा विपर्यास करण्यात आला. मी याआधीही सभागृहात भूमिका मांडली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती नेमली होती. त्या समितीने सारथी, महाज्योती, बार्टी किती विद्यार्थ्यांना संधी दिली पाहिजे याबाबत अभ्यास केला. मला कुणावर टीका करायची नाही. पण काही लोक राजकीय नेत्यांवर पीएच.डी. करत आहेत. त्या नेत्यांची मी नावं घेत नाही. पण पीएच.डी. एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. त्यात खूप अभ्यास करावा लागतो. त्यामुळे पीएच.डी.चा विषय तसा हवा, असे अजित पवार म्हणाले.

काही लोकांनी पीएच.डी. व्हावे. काही लोकांनी कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे. ट्रेनिंग दिल्यास नोकरी मिळू शकते. जर्मन भाषा जर येत असेल तर प्लंबर, फिटर अशा प्रकारची कामे तिकडे करता येतील. तिथे चार लाख मुला-मुलींची गरज आहे. पण त्यासाठी जर्मन भाषा आली पाहिजे. त्यासाठी जर्मन भाषा तरुणांनी शिकावी, यासाठी आम्ही प्रोत्साहन देतोय. ज्या मुलांना परदेशात नोकरी करावी वाटत असेल त्यांनी या संधीचा फायदा करून घ्यावा, असे अजित पवार म्हणाले.

जुन्या पेन्शन योजनेवर अजित पवार म्हणाले
जुन्या पेन्शन योजनेबाबत सुरु असलेल्या आंदोलनावरही अजित पवार यांनी भाष्य केले आहे. जुन्या पेन्शनबद्दल काल बैठक झाली. चर्चा झाली. वेगवेगळ्या संघटनांचे कामगार नेते उपस्थित होते. त्यांची समजूत काढली. तीन लोकांची कमिटी नेमली. अहवाल आपल्याला आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी पेन्शन संदर्भात सकारात्मक निर्णय सरकार घेईल, असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR