फिजिओथेअरपिस्टना आता ‘डॉक्टर’ लावता येणार नाही

नवी दिल्ली : आरोग्य सेवा महासंचालनालय यांनी फिजिओथेअरपिस्टसाठी एक महत्वाचा आदेश जारी केला असून आरोग्य सेवा महासंचालनालय अर्थात डीजीएचएस यांनी फिजिओथेअरपिस्ट यांनी आपल्या नावासमोर डॉक्टर अशी उपाधी लावू नये असे आदेश दिले आहे. ते वैद्यकीय डॉक्टर नाहीत असे डीजीएचएस ने स्पष्ट केले आहे.

डीजीएचएस डॉक्टर सुनिता शर्मा यांनी ९ सप्टेंबर रोजी लिहिलेल्या एका पत्रानुसार फिजिओथेअरपिस्टनी त्यांच्या नावासमोर डॉक्टर लावणे हे इंडियन मेडिकल डीग्री अ‍ॅक्ट १९१६ चे उल्लंघन आहे. त्यांनी हे पत्र आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर दिलीप भानूशाली यांना लिहिले आहे. त्यात त्या म्हणतात, ‘फिजिओथेरपिस्ट हे प्रशिक्षित वैद्यकीय डॉक्टर नाहीत. त्यामुळे त्यांनी डॉक्टर ही उपाधी लावू नये. यामुळे पेशंट आणि सामान्य नागरिकांची दिशाभूल होते. त्या पुढे म्हणतात, फिजिओथेरपिस्टना प्राथमिक वैद्यकीय प्रॅक्टिस करण्याची परवानगी नाहीे. त्यांनी फक्त रेफर केलेले पेशंटवरच उपचार करायचे आहेत. त्यांना मेडिकल कंडिशनचे निदान करण्याचे प्रशिक्षण मिळालेले नाही. यामुळे वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकते.

या पत्रात यापूर्वी विविध न्यायलयांनी दिलेल्या आदेशांचा देखील दाखला देण्यात आला आहे. यात पटना, मद्रास उच्च न्यायालयांच्या आदेशांचा रेफ्रन्स देण्यात आला आहे. याचबरोबर मेडिकल काऊन्सील ऑफ इंडियाने देखील फिजिओथेरपिस्ट किंवा ऑक्युपेशनल थेअरपिस्ट यांना डॉक्टर ही उपाधी वापरण्यास मनाई केली आहे.

एनसीएएचपीची मान्यता रद्द
एप्रिल महिन्यात नॅशनल कमिशन फॉर अलाईड अँड हेल्थ प्रोफेशन्स (एनसीएएचपी) यांनी फिजिओथेअरपिस्ट हे डॉक्टर ही उपाधी लावू शकतात असे जाहीर केले होते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अख्त्यारीत येत असलेल्या एनसीएएचपीने २०२५ मध्ये फिजिओथेअरपिस्ट करिक्युलम लाँच केला होता. त्याचाच भाग म्हणून हा निर्णय घोषित करण्यात आला होता.

उपाधी लावणा-यांवर कारवाई होणार
डीजीएचएसने स्पष्ट केले की, आम्हाला इथे नमूद करतोय की इथिक्स कमिटी ऑफ काऊन्सील यांनी यापूर्वी निर्णय घेतला होता की डॉक्टर ही उपाधी फक्त नोंदणीकृत मॉडर्न मेडिसीन, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी प्रॅक्टिशनर्सनाच लावता येते. वैद्यकीय क्षेत्रातील इतर कोणत्याही श्रेणीतील लोकांना ही उपाधी लावता येणार नाही. जर याचे उल्लंघन झाले तर आयएमएच्या कलम ७, ६ आणि ६ अ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Gunratan Sadavarte LIVE : सदावर्ते जरांगेंना रोखणार? ‘चलो मुंबई’च्या घोषणेनंतर काय म्हणाले?
00:00
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात रोहित पवार! ‘अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा दिलाच पाहिजे’
01:58
Video thumbnail
MPSC STUDENT PROTEST|MPSC विद्यार्थ्यांचा लातुरात आक्रोश;पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
03:44
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
10:07
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46

Latest news