22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरहदगावच्या भाविकांच्या पिकअपची बसला पाठीमागून धडक; २२ जण जखमी

हदगावच्या भाविकांच्या पिकअपची बसला पाठीमागून धडक; २२ जण जखमी

औसा : प्रतिनिधी
आषाढी निमित्त विठलाच्या दर्शन करून परतणा-या नांदेड जिल्ह्यातील भाविकांच्या पिकअपची बसला पाठीमागून धडक बसल्याची घटना लातूर जिल्ह्यातील औसा शहरा नजीक गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघात पिकअप मधील २२ भाविक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी हदगाव येथील भाविक पिकअप या वाहनाने पंढरपूर येथे गेले होते. पंढरपूरहून परतना-या हदगाव येथील या भाविकांच्या पिकअप क्र. एमएच २६ बीई ००३४ च्या वाहनचालकाचा पिकअप वरील ताबा सुटल्याने तो पंढरपूरहून यवतमाळ जिल्ह्यातील नेर कडे जाणा-या नेर आगाराच्या बस क्र. एमएच ४० एक्यू ६३२६ ला पाठीमागून धडकल्याची घटना गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास औसा शहरा नजीक असलेल्या एन. बी. शेख पॉलटिकनिक कॉलेज जवळ घडली आहे.

या अपघातात बंडू फुलारी, राधाबाई देवकर, प्रभाकर जाधव, बालाजी बावळे, कांताबाई बावळे, मंगल जाधव, सुशिलाबाई नळगे,रेणुकाबाई माळेवाड, सुशिलाबाई हरडफकर, विमलबाई गोरलेवाड, मथूराबाई वानखेडे, नथूराम गोरलेवाड, मिनाबाई पाटील, सुशिलाबाई जाधव, पुण्यरथाबाई पाटे, भोजनाथ भरलेवाड व सुर्यवंशी, टेम्पो चालक भास्कर शिंदे, विनंताबाई फुलारी, राजाबाई प्रकाश हार्डळकर, नथूराम पोशेट्टी गोरलेवाड, मिराबाई प्रभाकर जाधव, हे सर्व जखमी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कोथळा व भाणेगाव या गावातील आहेत. अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले आहे. या अपघातात एकूण २२ भाविक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR