22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरसराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई

सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई

सोलापूर : बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, घातक शस्त्राने मारहाण करणे, बेकायदेशीर सावकरी व्यवसाय करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्तालयाने स्थानबद्धतेची कारवाई केलीय. अभिजीत किसन ऊर्फ रेवण बंडगर असं त्याचं नांव आहे. पोलीस आयुक्त, डॉ. राजेंद्र माने यांनी कार्यभार स्विकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची अठरावी तर या वर्षातील चौदावी कारवाई म्हणून पाहिली जात आहे.येथील क्रांतीनगर, आमराई, वाय चौक, हब्बु वस्ती, जुना देगाव नाका, न्यु लक्ष्मी चाळ, पावन गणपती, बल्लार चाळ,दमाणी नगर, शेटे वस्ती, देशमुख-पाटील वस्ती, मरीआई चौक या परिसरात व्यापारी व सामान्य नागरीकांवर अभिजीत किसन ऊर्फ रेवण बंडगर याची दहशत आहे.

सामान्यांच्या मनात भिती घालून दहशत निर्माण करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले.याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांकडे त्याच्याविरुद्ध चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामुळे या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्याने सन २०१६ मध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.त्यानंतरही, अभिजीत किसन ऊर्फ रेवण बंडगर याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल, अशी गुन्हेगारी कृत्यं चालू ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी त्यास एमपीडीए अधिनियम, १९८१ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यास शुक्रवारी, २२ डिसेंबर रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ). विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-०१) डॉ. संतोष गायकवाड, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वनाथ सिद, पोउपनि/विशेंद्रसिंग बायस व एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ-/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी पार पाडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR