24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरसहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने नियोजन

सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने नियोजन

सोलापूर : कोरोना, दुष्काळ, अतिवृष्टी यासह इतर कारणास्तव लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११६० सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी अर्हता दिनांकाची मागणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे. अर्हता दिनांक मिळाल्यानंतर प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या या ११६० सहकारी संस्थांमध्ये व वर्गातील १०९, क वर्गातील ४१० व ड वर्गातील ६४१ सहकारी संस्थांचा समावेश आहे. ब वर्गामध्ये असलेल्या सहकारी संस्थांमध्ये दि सोलापूर सोशल अर्बन को-ऑप. बँक, विद्यानंद को-ऑप. बैंक कमला को-ऑप. बँक, व्यापारी को-ऑपरेटिव्ह बँक, समर्थ सहकारी बँक, वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक कर्मचारी सहकारी पतसंस्था, सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी, युनियन बैंक कर्मचारी सहकारी पतसंस्था, सोलापूर जिल्हा परिषद अभियंता सेवकांची सहकारी पतसंस्था, सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पत संस्था क्रमांक दोन, सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक एक या प्रमुख संस्थांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ११६० सहकारी संस्थांमध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील १४, अक्कलकोट तालुक्यातील २६, माळशिरस तालुक्यातील १९४, करमाळा तालुक्यातील ७७, माढा तालुक्यातील ९३, सांगोला तालुक्यातील ३७, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ७१, मंगळवेढा तालुक्यातील ५३, सोलापूर शहरातील ३८३, पंढरपूर तालुक्यातील ८३, मोहोळ तालुक्यातील ८१, बार्शी तालुक्यातील ४८ सहकारी संस्थांचा समावेश आहे.सोलापूर जिल्ह्यातील ज्या-ज्या सहकारी संस्था निवडणुकीसाठी पात्र ८८ आहेत. त्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही सूक्ष्म नियोजन केले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून जसजशी मान्यता येईल तसतसे या निवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे. असे जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण गायकवाड यांनी सांगीतले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR