24.2 C
Latur
Monday, March 3, 2025
Homeराष्ट्रीयअयोध्येत राम मंदिरावरील हल्ल्याचा कट उधळला

अयोध्येत राम मंदिरावरील हल्ल्याचा कट उधळला

प्रशिक्षित युवकाला अटक, २ हँड ग्रेनेड जप्त

अयोध्या : वृत्तसंस्था
अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला. दहशतवादी हल्ला करणारा युवक पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता. त्याने आयएसआयकडून प्रशिक्षण घेतले होते. हल्ला करण्यासाठी त्याने राम मंदिराची रेकी केली होती. ही योजना अंमलात आणण्यापूर्वी गुजरात अँटी टेररिस्ट स्कॉड आणि फरिदाबाद स्पेशल टास्क फोर्सने संयुक्त ऑपरेशन करून त्याला अटक केली. तो उत्तर प्रदेशातील फैजाबाद (अयोध्या) येथे राहतो.

अब्दुल रहमान (१९) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून २ हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले. संशयित आरोपी अब्दुल रहमान पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता. तो राम मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होता. फैजाबादमध्ये मटन शॉप चालवणारा अब्दुल रहमान हा कट्टवादी लोकांच्या संपर्कात आला होता. आयएसआयने राम मंदिराच्या निर्मितीनंतर त्या ठिकाणी दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचला होता. त्यासाठी अब्दुल रहमान याला प्रशिक्षण दिले होते.

राम मंदिराची केली होती रेकी
अब्दुल रहमानने हल्ला करण्यासाठी राम मंदिराची रेकी केली होती. त्याने सुरक्षा संदर्भातील महत्वाची माहिती आयएसआयला पुरवली होती. राम मंदिराचे हँड ग्रेनेडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याची त्यांची योजना होती. त्यासंदर्भात गुजरात एटीएसला इनपूट मिळाले. त्यानुसार फरिदाबाद पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने आरोपीला अटक केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR