२१ कोटींचा प्लॉट ५ कोटीत युसूफ पठाणच्या घशात

कोलकाता : लोकसभा खासदार युसूफ पठाण यांनी ज्या ममता दिदींच्या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली त्या टीएमसीला टाटा बाय बाय करत एनडीएची कास धरली होती. आता या धाडसी निर्णयाचा फायदा त्यांना मिळू लागला आहे. गुजरातमधील ज्या करोडो रूपयांच्या जमिनीचा वाद सुरू होता.

तो प्लॉट आता युसूफ पठाणच्या खिशात अलगद आला आहे. मेहरबान गुजरात सरकारने हा प्लॉट युसूफ पठाणला गिफ्ट केला आहे. तसेच एक मोठा भाग किफायतशीर दरात देण्याची देखील व्यवस्था केली आहे. नुकतेच युसूफ पठाणने टीएमसीच्या एका गटाने एससीपीआय या पक्षात विलिनीकरण करून घेतले आहे.

सध्याच्या घडीला व्हीएमसी अर्थात वडोदरा नगर पालिकेकडून प्लॉट मंजूर करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवण्यात आला असून तिथे यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गुजरात सरकारने याबाबतचा आदेश दिला होता. त्यात पठाणला मंजूर करण्यात आलेली जमीन देण्यात यावी असे निर्देश होते. त्यानुसार व्हीएमसीने हा प्रस्ताव तयार केला आहे. हे संपूर्ण प्रकरण ९७८ स्क्वेअर मीटर प्लॉटचे आहे.

करोडो रूपयाची जमीन मिळणार
सरकारी आदेशात म्हटले आहे की ५०० स्क्वेअर मीटरचा तुकडा हा पठाणला गिफ्ट करण्यात आला आहे. तसेच ४७८ स्वेअर मीटर जमीन ही ५५ टक्के सूट देऊन दिली जाईल. आदेशात हे देखील म्हटले आहे की या आदेशाला एक उदाहरण म्हणून पाहू नये. रिपोर्टनुसार टाऊन प्लॅनिंग स्कीम २२, फायनल प्लॉट नंबर ९० अंतर्गत हा पडीक प्लॉट आहे. याच्या जवळच पठाण कुटुंबाचे घर आहे. जुलै महिन्या व्हीएमसीच्या स्थायी समितीने या प्लॉटचा लिलाव करण्याची तयारी केली होती. याचा दर २.१० लाख रूपये प्रती स्क्वेअर किलोमीटर आहे. यानुसार या प्लॉटची अंदाजे किंमत ही २०.५ कोटी रूपये होते. मात्र या प्लॉटवर पठाण कुटुंबीयांनी अतिक्रमण केल्याची माहिती देखील समोर आली होती. त्यानंतर हा लिलाव रोखण्यात आला. त्यावेळी हे प्रकरण निकाली लागत नाही तोपर्यंत अतिक्रमणाचे प्रकरण संपणार नाही असे सांगण्यात आले होते.

नेमका वाद काय?
२०१२ मध्ये युसूफ पठाणने व्हीएमसीमध्ये प्लॉटचा लिलाव न करता तो ९९ वर्षाच्या करारावर मागितला होता. त्यावेळी या क्रिकेटपटूने आपल्या सुरक्षेबाबत अडचणी निर्माण होतील असे सांगितले होते. त्यावेळी व्हीएमसीने पठाण यांचे म्हणणे ऐकले होते. त्यावेळी या सर्वाची किंमत ५.४ कोटी रूपये होती. ती पूर्ण किंमत देण्यास युसूफ पठाण तयार होता. मात्र लिलावाशिवाय हा प्लॉट देण्यासाठी गुजरात सरकारच्या परवानगीची गरज होती. २०१४ मध्ये शहर विकास विभागाने युसूफ पठाणचा हा अर्ज रद्द केला होता. त्यानंतर नगरपालिकेने युसूफ पठाणचा प्रस्ताव रद्द करण्यात आल्यानंतर देखील त्याने या जागेवर कुंपण बांधल्याचा आरोप केला होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
00:00
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात | संजय बनसोडे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण
02:22
Video thumbnail
Nanded|माहूरगडावर व्हीआयपी दर्शनामुळे वाहतूक कोंडी? संतप्त भाविकाने आमदाराच्या गाडीची काच फोडली
01:39
Video thumbnail
Latur|जळकोट पोस्ट ऑफिसमध्ये दिव्यांगांची हेळसांड; प्रशस्त जागेत स्थलांतर करण्याची मागणी
01:29
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये जुने शेतकरी भवन जमीनदोस्त | दीड कोटींच्या नवीन भवनाचे काम सुरू होणार
02:04
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या बोरगावातील ४६ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
03:38
Video thumbnail
Latur|लातूर महापालिकेचा मोठा निर्णय! कर भरला नाही तर थेट मालमत्तेचा लिलाव!
01:40
Video thumbnail
Latur Water Theft News|लातूर मांजरा जलवाहिनीवर मोठी कारवाई! ३४ अनधिकृत कनेक्शन तोडले
02:09
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये दांडिया रासमधून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत
01:53
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये तरुणाला नग्न करून मारहाण! पेट्रोल टाकल्याचा आरोप; चौघांविरुद्ध गुन्हा
02:52
Video thumbnail
कैमेऱ्यात कैद झालेला सर्वात भीषण जीवघेणा हल्ला! टायगर श्रॉफ थोडक्यात वाचला; थरारक व्हिडिओ समोर
00:31
Video thumbnail
रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ घालताय? पोलिसांचा बडगा बसणार! #breakingnews #digitalekmat #marathinews
01:05
Video thumbnail
Nilanga Congress Protest | शेतकरी मदत आणि SIR वरून काँग्रेस आक्रमक | Latur News | Ekmat Digital
06:45
Video thumbnail
Latur News | दुष्काळामुळे डाळ-तांदूळ महागले? ३०% दरवाढीचा दावा | Inflation News | Ekmat Digital
02:18
Video thumbnail
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात पाच जणाचा मृत्यू #breakingnews #digitalekmat
00:57

Latest news