16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूरदोघा अट्टल मोबाईल चोरांना पोलीसांनी केले गजाआड

दोघा अट्टल मोबाईल चोरांना पोलीसांनी केले गजाआड

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरामध्ये नागरिकांना अडवून त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेवून चो-या करणा-या सौदागर उर्फ सौद्या अशोक हजारे रा. रामकृष्णनगर लातूर, रवि भुजंग कसबे रा. लक्ष्मी कॉलनी जुना औसा रोड लातूर या दोघांना स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हिसकावलेले १० मोबाईल व एक मोटारसायकल असे एकूण १ लाख ६० हजार रूपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करणे बाबत आदेशित करून सुचना केल्या होत्या.

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने फिर्यादीकडे सखोल विचारपूस करून त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील व लातूर शहरालगत असलेल्या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी करण्यात येत होती. दरम्यान दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी पोलीस पथकाला मिळालेल्या विश्वासनीय व गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती बरिष्ठांना कळवून आरोपींना अटक करण्यात आली.

लातूर शहरातील जुना औसा रेड परिसरात त्यांनी चोरलेले मोबाईल विकण्याचा प्रयत्न करीत असताना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी लातूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दोघांनी मिळून मोटर सायकल वरून तसेच पायी जाणा-या इसमाना अडवून त्यांच्याकडील मोबाईल जबरीने लुटले आहे, असे कबूल करून ताब्यातील चोरलेले एकूण १० मोबाईल, गुन्हे करताना वापरलेला एक मोटरसायकल असा एकूण १,६०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरच्या आरोपी कडून जप्त केलेल्या मुद्देमालावरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे जबरी चोरी संदर्भात दाखल असलेला एक गुन्हा उघड झाला असून विविध ठाण्याचे अभिलेखा बस्र लातूर शहरातील विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेले आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अमलदार तपास करीत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, राजू मस्के, तुराब पठाण, जमीर शेख यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR