श्रीनगर : श्रीनगरमधील बेमिना भागात शनिवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. या चकमकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला आहे. गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांचा सुरक्षा दल शोध घेत आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यात पोलिस कर्मचारी मोहम्मद हाफिज चाड जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी हमदनिया कॉलनी बेमिना येथे पोलीस कर्मचारी मोहम्मद हाफिज चाड यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांना जखमी केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. यापूर्वी २९ ऑक्टोबर रोजी श्रीनगरमध्ये एका पोलिसावर गोळीबार करण्यात आला होता, ज्यांचा गुरुवारी दिल्लीत मृत्यू झाला आहे.