धावत्या रेल्वेसमोर उडी मारून पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या ;हिंगोली पोलिस दलात खळबळ

हिंगोली : प्रतिनिधी
हिंगोली पोलिस दलातून आज सकाळी २९ ऑगस्ट रोजी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. पोलिस अधिका-याने रेल्वे समोर उडी मारत आत्महत्या केली. खाकी वर्दीमध्येच पोलिस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अमोल गांगणवाड असं या पोलिस अधिका-याचे नाव होते. ते हिंगोली पोलिस दलामध्ये पोलिस नियंत्रण कक्षात ते कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हा पोलिस दलातील नियंत्रण कक्षात रुजू असलेले पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड (वय ५० वर्षे) यांनी आत्महत्या केली. आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास धावत्या ट्रेनसमोर उडी मारत त्यांनी आयुष्य संपवलं. पूर्णा येथून अकोलाकडे जाणा-या ट्रेनची ते वाट पाहत होते. ट्रेन जवळ येताच त्यांनी उडी मारली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती रेल्वेचे लोकोपायलट यांनी हिंगोली रेल्वे स्टेशन मास्टर यांना दिली. त्यानंतर शहर पोलिसांना कळविण्यात आले. दरम्यान पोलिस अधिका-याच्या आत्महत्येची माहिती मिळताच हिंगोलीचे पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह पोलिस अधिका-यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

२ महिन्यापूर्वी परभणी पोलिस दलातून हिंगोली पोलिस दलात बदली झालेले पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड मनमिळाऊ स्वभावाचे होते. कर्तव्यदक्ष असलेल्या पोलिस अधिका-याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळावर पोलिसांना सुसाईड नोट सापडली नाही. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Contractor Sucide|थकीत बिलं आणि गुत्तेदाराची आत्महत्या; घटनेने उडाली खळबळ
02:13
Video thumbnail
Nanded|स्मशानभूमी नाही म्हणून तरुण थेट सरणावर झोपला! नांदेडमध्ये अनोखे आंदोलन
00:39
Video thumbnail
Latur|चिमुकल्यांचा जीव धोक्यात? वडवळ नागनाथच्या अंगणवाडीची धक्कादायक अवस्था
00:58
Video thumbnail
Nanded|नारळी पौर्णिमेला माहूर गडावर भाविकांची अलोट गर्दी; हजारो जण पायी दत्त शिखराकडे
00:39
Video thumbnail
Latur|बुलेटवर फटाका वाजवताय? सावधान! लातूर पोलिसांची थेट कारवाई
01:47
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून महामार्गावर हेल्मेट सक्ती;हेल्मेट नाही तर दंड
02:38
Video thumbnail
Nanded Murder|नांदेडमध्ये रक्तरंजित थरार! जुन्या वादातून तरुणाचा खंजरने खून
00:50
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामसभेत मोठा गोंधळ! प्रश्नांवरून सत्ताधारी-विरोधक भिडले
07:02
Video thumbnail
PARBHANI|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
31:41
Video thumbnail
NANDED|एकमतच्या सन्मानाची... सन्मानार्थींच्या मनातील भावना
45:46
Video thumbnail
DHARASHIV|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
42:06
Video thumbnail
Solapur|एकमत वर्धापन गौरव २०२६... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
28:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - परभणी
02:04:02
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - नांदेड
02:12:44
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:10:21

Latest news