20.5 C
Latur
Thursday, November 6, 2025
Homeमहाराष्ट्रपोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने सेवेतून बडतर्फ

पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने सेवेतून बडतर्फ

सातारा : फलटण येथील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आल्याचा आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बुधवारी काढला. फलटण येथे २३ ऑक्टोबर रोजी एका डॉक्टर युवतीने हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती.

फौजदार गोपाळ बदने याने चार वेळा अत्याचार केला तर इंजिनीयर प्रशांत बनकर याने मानसिक छळ केला, असे पीडित युवती डॉक्टरने तळहातावर लिहिल्याचे समोर आले होते. या प्रकारानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. इंजिनीयर बनकरला पुण्यातून पोलिसांनी अटक केली तर फौजदार बदने हा स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला होता. या प्रकरणात बदनेचे नाव समोर आल्यानंतर पोलिस अधीक्षक तुषार दोशी
यांनी बदनेला निलंबित केले होते.

बदनेमुळे पोलिस दलाची बदनामी झाली. असा ठपका ठेवून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, असा प्रस्ताव सातारा जिल्हा पोलिस दलातर्फे कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला सेवेतून बडतर्फ केल्याचा आदेश बुधवारी काढण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR