20.9 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeसोलापूरविधानसभा निवडणूकीत पोलिसांचे काम कौतुकास्पद : आयुक्त एम. राजकुमार

विधानसभा निवडणूकीत पोलिसांचे काम कौतुकास्पद : आयुक्त एम. राजकुमार

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पोलिस बंदोबस्ताचे व्यवस्थित नियोजन करून प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली. ड्रोनचही वापर केला. रात्री दहानंतर विनाकारण फिरणा-यांवर कारवाईचा निर्णय झाला. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. या पार्श्वभूमीवर निवडणूक शांततेत पार पडली. सर्वांनीच कौतुकास्पद काम केले.असे सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी सांगीतले.

लोकसभा निवडणूक, नवरात्र, गणेशोत्सव, दिवाळी हे सण-उत्सव पार पडल्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली. शहर हद्दीत सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर व दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा ६० टक्के भाग येतो.

एकूण ८२८ बुथसाठी २०१९ मध्ये १६५० स्थानिक बंदोबस्त, ११०० होमगार्ड व बाहेरील कंपन्या होत्या. पण, २०२४च्या निवडणुकीत ५०० होमगार्ड कमी, स्थानिक २०० अंमलदारांना बाहेर बंदोबस्त होता. तरीदेखील मतदान-मतमोजणी शांततेत, निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद ठरली.

विधानसभेच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री पवन कल्याण यांची रॅली, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे खासदार असुदोद्दीन ओवेसी, हैदराबादच्या भाजप नेत्या माधवी लता या दिग्गजांच्या सभा सोलापूर शहरात पार पडल्या. सभा, रॅलीचा बंदोबस्त करूनही पोलिसांनी निवडणुकीच्या बंदोबस्ताची ड्यूटी देखील व्यवस्थित पार पाडली.

आचारसंहिता जाहीर झाल्यापासून पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त विजय कबाडे, अजित बो-हाडे, डॉ. दीपाली काळे यांनी मनुष्यबळ कमी असताना देखील निवडणूक बंदोबस्ताचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले होते. निवडणूक झाली, तरीदेखील रात्री १०नंतर विनाकारण घराबाहेर फिरणा-यांवर पोलिसांचे लक्ष असणारच आहे.

सुरवातीला शहरातील मतदारसंघातील ८२८ बूथचे नियोजन तयार केले ४५ सेक्टर, १५ हून अधिक ड्रोनद्वारेही लक्ष ठेवण्यात आले.प्रत्येक सेक्टरसाठी एक पोलिस उपनिरीक्षक, चार अंमलदार नियुक्त करण्यात आले. सायबर पोलिसांकडून सोशल मिडियावर वॉच ठेवण्यात आला.

प्रत्येक चार सेक्टरसाठी एक पोलिस निरीक्षक, चार अंमलदार, क्राईम ब्रँच, गुप्ता वार्ताचीही पथके तयार करण्यात आली.एका मतदारसंघासाठी एक सहायक पोलिस आयुक्त व मदतीला एक दंगा नियंत्रक पथक ठेवण्यात आले.प्रत्येक मतदारसंघावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्त व त्यांच्यासोबत (क्युआरटी) शिघ्र प्रतिसाद पथक नेमण्यात आले.
पोलिस आयुक्तांकडून नियमित सर्व बंदोबस्तावरील देखरेख, नियोजनाची पाहणी करण्यात येत होती.

फेब्रुवारी ते २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील तब्बल २४ जणांवर स्थानबद्धतेची (एमपीडीए) कारवाई करून त्यांना पुण्यातील येरवडा कारागृहात पाठविले. याशिवाय ८० जणांना तडीपार करण्यात आले. या कारवाईचा मोठा परिणाम झाला आणि शहरातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे पाहायला मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR