28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमांढरदेवी मंदिरात राजकारण्यांना प्रवेश बंदी

मांढरदेवी मंदिरात राजकारण्यांना प्रवेश बंदी

मराठा आरक्षणासाठी असा निर्णय घेणारे पहिलेच मंदिर

सातारा : मराठा आंदोलनाची धग गावापासून आता मंदिरांपर्यंत पोहचल्याचे दिसून येत आहे. साता-यातील मांढरदेवी गडावर आता राजकारण्यांना प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना आता मांढरदेवी गडावरील काळूबाईचे दर्शन घेता येणार नाही. मंदिराबरोबर गावात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनाची धग आता राज्यभर पसरताना दिसत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकारण्यांना गावबंदी करा अशा सूचना मनोज जरांगे यांनी केल्यानंतर आता गावागावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात येत आहे. त्यातच आता ही बंदी मंदिरापर्यंतही पोहोचल्याचे दिसून येते आहे.

साता-यातील मांढरदेवी गावात आता राजकारण्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच मांढरदेवी गडावरील काळूबाईचे दर्शनासही बंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजातील अंदोलकांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मांढरदेवी ग्रामपंचायतीनेही यावर शिक्कामोर्तब केले आहे.

मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून आता वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश दिले जाणार नसल्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच, गावात राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधी आल्यास त्यांना विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ग्रामीण भागात देखील तापतांना दिसत आहे.

जरांगे यांना पाणी पिण्यासाठी आग्रह
मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी शेकडो लोकांनी हात जोडून प्रार्थना केली. यावेळी त्यांनी विनंती मान देताना पाणी घेण्याची विनंती मान्य केली. मात्र, सरकारला एखादा बळी द्यायचा असेल तर घेऊ द्या, जाणूनबुजून आपल्या समाजाच्या लेकरांवर अन्याय केला जात आहे. न्याय मिळवण्यासाठी, आरक्षण मिळवण्यासाठी एका जणाचा जीव गेला तरी चालतो पण न्याय मिळला पाहिजे, न्याय मिळण्याचा दिवस जवळ आला आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी देताना त्यांचे डोळे पाणावले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR