21.3 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमुख्य बातम्यालोकसभा निवडणुकीसाठी सहकारी सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र

लोकसभा निवडणुकीसाठी सहकारी सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता शहरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्येदेखील मतदान केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. शहरी मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. ज्या गृहनिर्माण सोसायटीत मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत, त्या सोसायटीतील रहिवाशांबरोबरच त्या सोसायटीच्या बाहेरच्या नागरिकांना देखील त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी जावे लागणार आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या जिल्ह्यांमधे अशी मतदान केंद्रे तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानंतर पुण्यातील ३६ गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आगामी निवडणुकीसाठी मतदान केंद्र तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

या आधीच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या मतदान केंद्रांवरच मतदान करता येत होते. निवडणूक आयोगाच्या या ताज्या निर्णयानंतर आता शहरातील गृहनिर्माण सहकारी सोसायट्यांमध्येही मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR