22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपूजा खेडकरची हायकोर्टात धाव

पूजा खेडकरची हायकोर्टात धाव

औरंगाबाद खंडपीठात सुनावणी आता केला मोठा दावा

पुणे : माजी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. पूजा खेडकर गेल्या वर्षी वादात अडकली. बोगस कागदपत्रांआधारे प्रशासकीय पदाचा फायदा लाटल्याचा तिच्यावर ठपका ठेवण्यात आला. पुण्यात प्रशासनात केलेल्या अवास्तव मागण्यांनंतर ती प्रकाश झोतात आली होती. त्यानंतर ती एक एक वादात अडकत गेली. तर तिची आई पण पुढे वादात सापडली. आता पूजा खेडकरने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

बोगस प्रमाणपत्रा आधारे आरक्षणाचा लाभ घेतल्याचा तिच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तर यूपीएससी परीक्षा देण्यासाठी अतिरिक्त संधी मिळावी यासाठी पूजाने नावात बदल करुन शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर यूपीएससीने तिच्यावर गुन्हा दाखल केला. तिचे आयएएस पद रद्द करण्यात आले. ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी आई, वडिलांपासून विभक्त राहत असल्याची कागदपत्रे दिली होती. या सर्वांची छानणी झाली. त्यानंतर तिच्यावर विविध प्रकरणात गुन्हे नोंदवण्यात आले.

बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवून आरक्षण लाटल्याप्रकरणात पूजा खेडकर हिच्यावर यूपीएससीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी पूजाने धावा धाव केली आहे. अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी पूजाने कोर्टात धाव घेतलेली आहे. खेडकरने खोटी प्रमाणपत्र देत अनेकवेळा परीक्षा दिल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलेला आहे.

औरंगाबाद खंडपीठात याचिका
विविध प्रकरणात अडकलेल्या पूजा खेडकर हिने आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. अहिल्यानगर जिल्हाधिका-यांचा नॉन क्रिमिलिअर संबंधितचा अहवाल रद्द करण्याची विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. तर यासंबंधीची सुनावणी अहिल्यानगर जिल्हाधिका-यांकडून काढून ती अन्य जिल्ह्यात वर्ग करण्याची विनंती करण्यात आली आहे.

मनोरमा खेडकर यांचा परवाना रद्द करण्यास नकार
मुळशी तालुक्यातील जमिनीच्या वादात पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर यांनी समोरच्या व्यक्तीला पिस्तूल दाखवून धमकावले होते. त्यांचा हा व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्याची दखल घेत पुणे पोलिस आयुक्तांनी मनोरमा खेडकर यांच्या पिस्तुलाचा परवाना रद्द केला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले असता मुंबई हायकोर्टाने मनोरमा खेडकर यंचा पिस्तूल परवाना रद्द करण्याचा निर्णय फेटाळून लावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR