18.7 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeमहाराष्ट्रवसतिगृहाची दुरवस्था; शिरसाट भडकले!

वसतिगृहाची दुरवस्था; शिरसाट भडकले!

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रिपदी निवड आणि सामाजिक न्याय विभाग खाते मिळाल्यानंतर संजय शिरसाट कामाला लागले आहेत. मंगळवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील किल्लेअर्क परिसरात असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला त्यांनी अचानक भेट दिली. या भेटीत वसतिगृहाची दुरवस्था आणि तेथील चित्र पाहून संजय शिरसाट चांगलेच भडकले.

तिथे उपस्थित अधिकारी, कर्मचा-यांना धारेवर धरत तुम्हाला मस्ती आली आहे का? इतक्या वाईट अवस्थेत तुम्ही एक दिवस तरी राहू शकता का? असे म्हणत त्यांनी सगळ्यांची खरडपट्टी काढली. यावेळी शिरसाट यांनी वसतिगृहातील कोपरान् कोपरा तपासला. मुलांच्या रूमपासून तर स्वच्छतागृह आणि गच्चीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या सुद्धा शिरसाट यांनी जाऊन पाहिल्या. या सरप्राईज व्हिजिटनंतर नेमकी आपल्याला कुठून सुरुवात करावी लागणार आहे? याचा अंदाज शिरसाट यांना आला असावा.

राज्य सरकार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यभरात गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवते. त्यावर कोट्यवधीचा खर्च केला जातो, मात्र एवढे करूनही विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत ही वस्तुस्थिती खुद्द सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनाच आज पहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात संजय शिरसाट यांची यावेळी वर्णी लागली. संभाजीनगर शहरातील किल्लेअर्क भागात विद्यार्थ्यांसाठी चार-पाच स्वतंत्र इमारतींचे सरकारच्या मालकीचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात शेकडो विद्यार्थी राहतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR