मुंबई : प्रतिनिधी
२०२५ मध्ये सरकार खास मध्यमवर्गासाठी एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेत आहे. आरबीआयने कर्जावरील व्याजदरात कपातीचा निर्णय घेऊन मध्यमवर्गीयांना अगोदरच दिलासा दिला आहे. तत्पूर्वी बजेटमध्ये १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्याने याचाही फायदा मध्यमवर्गीयांना झाला आहे. त्यातच आता केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनासुद्धा सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे.
कारण पीएफवर व्याज वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएफधारकांना अधिक आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रोव्हिडंड फंडाविषयीचे सर्व निर्णय ईपीएफओमार्फत घेतला जातो. आता संघटनेच्या बोर्डाची बैठक होणार आहे. ही बैठक २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीत व्याजदर वाढीचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
व्याजदर वाढल्यास कर्मचा-यांना मोठा दिलासा मिळेल. मोदी सरकारच्या काळात कर्मचा-यांना सर्वात कमी व्याजदर मिळाला होता. त्यानंतर त्यात वाढ करण्यात आली. आता जर बचतीवर व्याजदर वाढला तर कर्मचा-यांना चांगला फायदा होऊ शकतो.