28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रसक्षम सीईओसाठी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम

सक्षम सीईओसाठी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम

पुणे : भारतीय रिझर्व बँक ही नागरी सहकारी बँकांच्या नियमामध्ये सातत्याने सुधारणा व बदल करत आहे. त्याचबरोबर नवनवीन बंधने घालण्यात येत आहेत. रिझर्व बँकेने सक्षम आणि सुयोग्य मुख्य कार्यकारी अधिकारी असावा, असे बंधन नागरी सहकारी बँकांवर घातले आहे. त्यामुळे आता बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना उत्तमरीत्या तयार करण्याकरिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम साकारण्यात आला आहे.

सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ व पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने याबाबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष ऍड.साहेबराव टकले, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ.अनिल कारंजकर उपस्थित होते.

ऍड.मोहिते म्हणाले, अनुभवी व कार्यक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी मिळण्यामध्ये नागरी सहकारी बँकाना अडचणी येत आहेत. यावर पर्याय उपलब्ध करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाशी संपर्क साधून एक पदविका अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमासाठी नागरी सहकारी बँकेमध्ये किमान १० वर्षे काम केल्याचा अनुभव लागणार असून कमाल वय ४५ वर्षे असेल अशा अधिकारी वर्गाला प्रवेश घेता येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR