मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक आहेत. त्यांनाच अमित शहा यांनी भाजपने सोबत घेतले, हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. संसदेत उभे राहून बोलण्याची त्यांची लायकी आहे का? तुम्ही स्वत:चा रंग पहा आणि मग बघा असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, देशाचा सर्वात मोठा शत्रू जो पाकिस्तानमध्ये आश्रयाला आहे, त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांचे संबंध आहेत. ते दाऊदच्या पक्षातून भाजपमध्ये गेले. संपत्ती वाचवण्यासाठी आणि कारागृहात जावे लागू नये म्हणून ते दाऊदच्या सर्व संबंधासह भाजपमध्ये गेले. राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणा-या अमित शहा यांनी त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतले.
संजय राऊत म्हणाले की, भाजपने दाऊदचे हस्तक आपल्या पक्षात घेतले आहे. हे दुस-यांना निष्ठेच्या आणि रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात. अजित पवार यांनी स्वत:च अवमुल्यन करुण घेतले आहे.
प्रफुल्ल पटेल हे कुणाचेच नाही ते दलाल आहेत. कधी काँग्रेसची दलाली केली त्यानंतर शरद पवारांना बाप-बाप केले मग दाऊची दलाली केली. मग भाजपसह आले आणि त्यांची हजार कोटीची संपत्ती मोकळी झाली. संसदेत उभे राहून बोलण्याची त्यांची लायकी आहे का? तुम्ही स्वत:चा रंग पहा आणि मग बोला. तुम्हाला दाऊदचा हिरवा रंग लागला आहे. पटेलांनी माझ्या नादी लागू नये मी नागडा करेल. जर इतिहास मी काढला तर त्यांना महाराष्ट्र सोडून जावे लागेल. ही लोकं देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला बसतात काय लेव्हल आहे का फडणवीसांची. या लोकांना पाठिचा कणा नाही, दिल्लीसमोर कायम वाकलेले असतात आणि हे दिल्लीत आपले नेतृत्व करतात.
पंतप्रधानांनी केली टीका
संजय राऊत म्हणाले की, भाजपने स्वत:ची लायकी दाखवून दिली आहे. प्रफुल्ल पटेलांवर दाऊदचा आरोप आम्ही केला नाही तर देशाच्या पंतप्रधानांनी केला आहे. कुछ लोग मिरची का व्यवहार करते है तो कुछ मिर्चीसे व्यवहार करते है असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. हे भंडा-यात येऊन कोण बोलले हा मिर्ची कोण? स्फोट करणा-या व्यक्तीसोबत व्यवहार झाला आहे. भाजपचे बुट चाटून तुम्हाला क्लीन चीट मिळाली असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
पवारांची तब्बेत खराब असल्याने गैरहजर
संजय राऊत म्हणाले की, वक्फचा जो विषय सुरू आहे तो केवळ जमिनी मिळवण्यासाठी सुरू आहे. आम्ही जे मतदान केले तेव्हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी केला आहे. शरद पवार यांची तब्बेत खराब असल्याने ते काल सभागृहात उपस्थित नव्हते. त्यांच्या पक्षाच्या खासदार खान यांनी चांगली भूमिका मांडली. त्यांच्या पक्षाच्या लोकांनी लोकसभेत चांगली भूमिका मांडली.
फडणवीस गरीबांसाठी काम करत नाही
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे गरीबांसाठी नाही तर मोठ्या उद्योगपतीसाठी कामे करतात. त्यांना मते मिळवून देणा-या कार्यकर्त्यांची पत्नी काल आरोग्य सेवा वेळेवर न मिळाल्याने मरण पावली. हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीसांनी रुग्णालयावर कारवाई करावी. त्यांच्या नागपूरमध्ये आज गोळीबार करत एका तरुणाची हत्या करण्यात आली हे त्यांना माहिती आहे का असा सवालही राऊतांनी यावेळी उपस्थित केला आहे.