मुंबई – व्हॅलेंटाईन डे च्या औचित्याने प्रतीक बब्बर-प्रिया बॅनर्जी यांनी लग्नगाठ बांधली. दोघांनी १४ फेब्रुवारीला मुंबईतील बांद्रा येथील त्याची आई दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या घरी विवाह केला. हा एक खासगी सोहळा होता. प्रतीकने लग्नाचे फोटो, व्हीडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने एक भावूक पोस्ट देखील लिहिली आहे.
प्रिया बॅनर्जी कॅनेडियन अभिनेत्री आहे. ती बंगाली असून तिचे संगोपन कॅनडामध्ये झाले. तिने हिंदी, तमिळ, तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. बॅनर्जीचा २०१३ मध्ये तेलुगूमध्ये ‘किस’ हा पहिला चित्रपट रिलीज झाला होता. ती दुसरा तेलुगू चित्रपट ‘जोरू’ मध्ये दिसली होती. ज्यामध्ये संदीप किशन आणि राशी खन्ना मुख्य भूमिकेत होते.
२०१५ मध्ये, तिने तिसरा तेलुगू चित्रपट ‘असुर’ केला. यामध्ये नारा रोहितसोबत हरिका म्हणून तिची भूमिका होती. मीडिया रिपोर्टनुसार, प्रतीकने आईच्या घरामध्ये खासगी समारंभ का केला, याबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘आम्हाला घरातच लग्न करायचं होतं आणि आपल्या लव्ह ऑफ लाईफ ते लग्नापर्यंत घरापेक्षा दुसरे ठिकाण कोणते असू शकते, हे पहिले घर आहे जे माझ्या आईने खरेदी केले होते