27 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeक्रीडाप्रविण कुमारची ‘सुवर्ण’ उडी

प्रविण कुमारची ‘सुवर्ण’ उडी

भारताला आणखी एक सुवर्णपदक

पॅरिस : पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली. प्रवीण कुमार याने पुरुष गटातील उंच उडीतील टी-६४ क्रीडा प्रकारात ऐतिहासिक कामगिरी केली. २.०८ मीटर उंच उडीसह त्याने सर्वोत्तम कामगिरीसह नवा क्षेत्रीय रेकॉर्ड सेट करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताच्या खात्यातील हे सहावे गोल्ड आहे.

जन्मापासून अपंगत्व असताना प्रवीण शाळेत असल्यापासून खेळात सक्रीय असायचा. पॅरा ऍथलिट्स होऊन जागतिक स्पर्धेत कसे सहभागी होता येईल, याची माहिती त्याने गुगल सर्च इंजिनच्या माध्यमातून आत्मसात केली. आता त्याने जगाच्या मानाच्या स्पर्धेत देशाची मान उंचावणारी कामगिरी करून दाखवली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR