15.2 C
Latur
Wednesday, January 7, 2026
Homeमहाराष्ट्रपर्यटकांसाठी समुद्रकिनारी सचेत पोर्टलद्वारे खबरदारी

पर्यटकांसाठी समुद्रकिनारी सचेत पोर्टलद्वारे खबरदारी

राज्य शासनाचा अभिनव उपक्रम

सिंधुदुर्गनगरी : सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. यात समुद्रकिनारी भेट देणा-या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे. आपत्तीतून होणारी हानी टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत अनेक पूर्वतयारीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. आपत्तीपूर्व सज्जतेच्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला आहे.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्ह्यात समुद्रकिनारी येणा-या पर्यटकांना खबरदारीच्या सूचना देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून समुद्रकिनारी भेट देणा-या पर्यटकांच्या भ्रमणध्वनीवर पूश नोटिफिकेशनद्वारे खबरदारीच्या सूचना पाठविण्याबाबत मोबाईल कंपन्यांना आदेशित करण्यात आलेले होते. याबाबत राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांना कळवून संबंधित मोबाइल कंपन्यांकडे याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत करण्यात आलेली होती.

याबाबत राज्य शासनाने दखल घेऊन आपत्तीपूर्व तयारीच्या अनुषंगाने सदर बाबीचे महत्व लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या सचेतद्वारे समुद्रकिनारी भेट देणा-या पर्यटकांना समुद्री पर्यटनाचा आनंद घेताना कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, याबाबतच्या सूचना प्रसारित केल्या. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणकडून खबरदारीच्या सूचना फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता मर्यादित न ठेवता संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिना-यांना भेट देणा-या पर्यटकांसाठी पाठविण्याचे ठरविण्यात आले.

प्रथमच या पोर्टलवरून संदेश यंत्रणा
पूर, चक्रीवादळ, वीज पडणे अशा आपत्तींच्या अनुषंगाने पूर्वसूचना देण्यासाठी राज्य शासनामार्फत सचेत पोर्टलचा वापर केला जातो. पर्यटन हंगामात पर्यटकांना समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद घेताना घ्यावयाच्या सावधगिरीच्या सूचनांबाबत प्रथमच या पोर्टलवरून संदेश प्रसारित करण्यात आले.

भरती-ओहोटीचा समावेश
या सूचनांमध्ये भरती-ओहोटीची माहिती न घेता समुद्रात उतरू नये, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, लाईफ जॅकेट घालूनच बोटीतून प्रवास करा, गर्दीत जाणे टाळा, आपत्कालीन मदतीसाठी टोल-फ्री १०७७, ११२ वर संपर्क साधा अशा महत्वाच्या बाबींचा अंतर्भाव होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR