हिंगोलीत महिला बसचालकाचे प्रसंगावधान; एसटी शेतात उतरवून मोठा अपघात टाळला, प्रवासी सुखरूप

हिंगोली : प्रतिनिधी
वसमत ते परभणी मार्गावर वसमत आगाराच्या बसला दुस-या बसने ओव्हरटेक करून कट मारल्याने वसमत आगाराच्या बस चालक करुणा पंडीत यांनी अपघात टाळण्यासाठी बस थेट रस्त्याच्या खाली शेतात उतरवून थांबवली. शुक्रवारी ता. २३ सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत आगाराची वसमत ते परभणी बस सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वसमत येथून परभणीकडे रवाना झाली. यावेळी महिला चालक करुणा पंडीत तर वाहक म्हणून आंबादास दळवी हे कर्तव्यावर होते. त्यांची बस झिरोफाटा येथे आल्यानंतर काही प्रवासी बसखाली उतरले त्यानंतर बस परभणीकडे मार्गस्थ झाली.

दरम्यान, झिरोफाट्या पासून काही अंतरावर पाठीमागून भरधाव वेगात येणा-या नांदेड आगाराच्या नांदेड ते बीड या शिवाई बसने ओव्हरटेक करतांना वसमत आगाराच्या बसला कट मारला. नांदेड आगाराच्या बसच्या पाठीमागील भाग वसमत आगाराच्या बसला धडकण्यापुर्वी महिला चालक करुणा पंडीत यांनी बस बाजूला घेतली मात्र अरुंद जागा असल्याने चालक पंडीत यांचे वाहनावरील नियंत्रण सुटत असतांनाही त्यांनी बसचे स्टेअरींग सोडलीच नाही.

या परिस्थितीत प्रसंगावधान राखून त्यांनी बस थेट रस्त्याच्या खाली जाऊन एका शेतात नेऊन थांबवली. मात्र नांदेड आगाराच्या बस चालकाने त्यांची बस न थांबवता पुढे निघून गेले.
दरम्यान, अवघ्या दोन मिनीटात झालेल्या या घटनेमुळे प्रवासी देखील घाबरून गेले होते. मात्र यावेळी चालक करुणा पंडीत व वाहक दळवी यांनी प्रवाशांनाच धिर दिला.

याघटनेमध्ये बसमधील १७ पैकी एकाही प्रवाशाला साधी दुखापतही झाली नाही तसेच बसचेही नुकसान झाले नाही. चालक करुणा पंडीत यांनी प्रसंगावधान राखत दाखविलेल्या समयसुचकतेमुळे मोठा अपघात टळळा. बसमधील प्रवाशांनी महिला चालक पंडीत यांच्या धैर्याचे कौतूक केले. तर वसमत आगार प्रमुख दीपक भुसारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच चालक पंडीत यांचे कौतूक केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59

Latest news